मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी शारीरिक इजा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . यानंतर अधिकाऱ्याला हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हाट्सअप वरुन फॉरवर्ड केलं म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना शारीरिक इजा केली. यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. यावरून आता वादंग पेटलं आहे.
तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानेच शिवसेनेला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी, ” शिवसेनेची ही गुंडागर्दी असून सुरुवातीपासुनच शिवसेना हा गुंडांचा पक्ष” असल्याचा घणाघात केला आहे. त्यामुळे सत्तेतील पक्षानेच शिवसेनेला झापल्यामुळे आता आघाडीतील विचारभेद पुन्हा समोर आले आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड वरून झालेल्या वादातून एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यासह देशात अनेक वेळा अशा घटना घडलेल्या दिसून येतात. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धक्कदायक आणि दुःखद घटना. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली. माननीय उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवावा. या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो, अस फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
- कोरोनामुळे सर्वच घटकांचे आर्थिक स्तरावर नुकसान झाले आहे, परंतु कोरोनाशी मत करण्यासाठी शिवसेना सर्व शर्थीने प्रयत्नशील – उदय सामंत
- जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अजित पवारांनी भरला दम !
- वीर सावरकरांवर काँग्रेसने घृणास्पद आरोप केले तेव्हा उद्धव ठाकरे शांत राहिले आणि आता…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

