Share

पीएमसी बॅंकेचे मराठवाड्यातील व्यवहार ठप्प, पैशांसाठी खातेदारांची गर्दी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आर्थिक अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. या बॅंकेच्या औरंगाबादेतील दोन्ही शाखांत ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. सहा महिने व्यवहार बंद राहणार असल्याचा संदेश मंगळवारी (ता.24) बॅंकेतर्फे खातेदारांना पाठविण्यात आला आहे. यामूळे पै- पै जमा करून बॅंकेत ठेवलेले पैसे निघत नसल्यामूळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आपल्या खात्यावरील पैसे मिळावेत यासाठी खातेदारांनी दोन्ही शाखेत गर्दी केली होती.

रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवर प्रॉम्प्ट करेक्टीव्ह ऍक्शन घेतली आहे. यामूळे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यात बॅंकेच्या तीन शाखा आहेत. त्यातील दोन शाखा औरंगाबादेत आहेत. तर एक शाखा नांदेडला आहे. या तिन्ही शाखेत हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत.

राष्ट्रीय बॅंकेच्या रॅंकनुसार कार्य करणाऱ्या या बॅंकेवर ग्राहकांनी मोठ्या विश्वासाने गुंतवणुक केली होती. जालना रोडवरील बग्गा चेंबर्समध्ये या बॅंकेची शाखा आहे. तर दुसरी शाखा विकास नगर उस्मानपूरा येथे आहे. नांदेड येथील बालाजी मंदिराजवळ बॅंकेची शाखा आहेत. या तिन्ही शाखांतील हजारो खातेदारांना या निर्बंधामूळे त्रास सहन करावा लागणार आहे. अनेकांनी कर्ज काढले आहेत. तर अनेकांच्या ठेवी, बचत खाती या बॅंकेत आहेत. मात्र आता त्यांना ही पैसे काढता येणार नाही.

या बॅंकेचे नियमीत अपडेट एसएमएसव्दारे येतात. आजही बॅंकेचा एसएमएस आला. नियमित संदेश असेल म्हणून, याकडे दुर्लक्ष केले. मात्र बॅंकेच्या मॅनेजरचा फोन आला, ते म्हणाले, तुम्हाला माहित आहे का तुमचे खाते सहा महिन्यांसाठी बंद राहणार आहे. हे एकुण मला धक्काच बसला. माझे सर्व व्यवहार याच बॅंकेच्या माध्यमातून होतात. चालू आणि बचत असे एकूण अकरा खाते या बॅंकेत आहे. दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार झाल्यामूळे माझ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. आता पुढे काय करावे हेच सूचत नाही.
– कृणाल मालाणी, खातेदार

खातेदारांना सहकार्य करण्याचे आवाहन

या निर्णयानंतर बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी खातेदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेवर कलम 35 ए अंतर्गत प्रॉम्प्ट करेक्टीव्ह ऍक्शन घेतली आहे. 23 सप्टेंबर पासून निर्बंध लागू झाल्याची अधिसूचना आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे बँकेच्या खातेदारांना ‘आरबीआय’च्या निर्देशानुसार बँक खात्यातून मर्यादित रक्कम काढता येते. अनियमितता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील सहा महिन्यात त्यात यश येईल असे थॉमस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1176414534333952001?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176410534016512000?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176408283583696896?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!