🕒 1 min read
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची एएनआय या वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली असून. या मुलाखतीत देशातील पाच राज्यांच्या निवडणुकासंबंधी पंतप्रधान मोदी यांनी दावा केला आहे. संसदेत केलेल्या भाषणानंतर विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आज त्यांच्या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी एनआयए वृत्तसंस्थेच्या स्मिता प्रकाश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे. यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत प्रश्न विचारले असता यावर बोलताना मोदी म्हणाले की पाचही राज्यांमध्ये भाजपच जिंकणार आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील आम्हालाच बहुमत मिळणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे देखील कौतुक मोदींनी केले आहे. उत्तर प्रदेशात क्राइम रेट कमी होण्यास योगी आदित्यनाथ यांचे योगदान मोठे आहे, असं मोदी म्हणाले. तसेच तिथल्या मुली व महिला देखील रात्रीच्या वेळी स्वतःला सुरक्षित समजत असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘…आणि मी नाही त्यातला म्हणायचं’; नारायण राणेंचा राऊतांना टोला
-
अनिल देशमुखांनी दिली कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; सचिन वाझेंचा गौप्यस्फोट

