🕒 1 min read
सांगली : लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हीच शेतकऱ्यांची अडचण सरकार दरबारी पोहचवण्यासाठी रयत क्रांतीचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत लॉकडाऊन काळात एक आंदोलन उभारत आहे. हे आंदोलन लॉकडाऊनचा कोणताही नियम पाळून केले जाणार आहे.
यावर सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘अंगण हेच माझे आंदोलन’ या स्लोगनखाली हे आंदोलन 15 मे पासून राज्यभर उभारले जाणार आहे. हे आंदोलन अंगणात, शेतात बसून केले जावे आणि सरकार दरबारी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी दाखवून देणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आणि विविध प्रश्नावर हे आंदोलन करण्यात येत असून तमाम शेतकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलनामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन माजी मंत्री खोत यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचा साता बारा कोरा करावा, आधारभूत किंमतीने शेती माल खरेदी करावे किंवा प्रति क्विंटल 1 हजार या अनुदान देण्यात यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देण्यात यावी, दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळं फळ-भाजीपाल्याचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, त्याच बरोबर रेशनकार्ड नसणाऱ्या कामगार, शेत मजुरांना मोफत धान्य आणि 2 हजार रुपये भत्ता देण्यात यावा, तसेच शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून या शेतकऱ्यांना सर्व पातळ्यांवर मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून कोरोनाच्या या स्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
PM मोदींच्या पॅकेजवर रोहित पवार म्हणतात, गुंतवणूक केंद्री नको रोजगार केंद्री अनुदान द्या
महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा : अमोल कोल्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
