मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅॅकेजनंतर राज्यातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर एक सल्ला दिला आहे.
लोकांच्या हातात पैसे नाहीत. बेरोजगारीने रौद्ररुप धारण केलं आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने गुंतवणूक ओरिएंटेड सबसिडी (गुंतवणूक केंद्रित अनुदान) देण्यापेक्षा रोजगार ओरिएंटेड सबसिडी (रोजगार केंद्रित अनुदान) देण्याची गरज आहे. दोन्ही सरकारांनी याचा विचार करावा.” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेन्शन केले आहे.
लोकांच्या हातात पैसे नाही व बेरोजगारीने रौद्ररूप धारण केलंय.हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने गुंतवणूक ओरिएंटेड सबसिडी देण्यापेक्षा रोजगार ओरिएंटेड सबसिडी देण्याची गरज आहे.दोन्ही सरकारांनी याचा विचार करावा.@nsitharaman @AjitPawarSpeaks@Subhash_Desai @iAditiTatkare
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 13, 2020
दरम्यान देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केले.
यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत हा सवाल केला आहे. आपण माध्यमांना हेडलाईन दिली पण गरिबांना हेल्पलाईनची गरज आहे, हे कधी देणार ? असा सवाल विचारण्यात आला आहे, असा सवाल सुरजेवाला यांनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल : चंद्रकांत पाटील
मुंबईत रेड झोन असल्यामुळे सध्या रेल्वे लोकल सेवा सुरू करू नयेत – रामदास आठवले

