Share

मुस्लिम भगिनींनी माझे कौतुक केल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते, नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका 

Published On: 

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात या पाच राजांच्या विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत. तर १० मार्च रोजी या सर्व निवडणुकांचा निकाल लागणार आहे.पंजाब,उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यात निवडणूका होणार आहेत.

आज उत्तरप्रदेश राज्यात पहिल्या टप्याचे मतदान होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष प्रचारास मुभा दिल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उत्तरप्रदेश मध्ये पहिल्यांदा जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचाराच्या रणमैदानात उतरले असून उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे त्यांची आज पहिली जाहीर सभा झाली.

आम्ही २०१९ मध्ये तीन तलाखवर बंदी आणणारा कायदा आणला,मुस्लिम भगिनींना आम्ही तीन तलाक प्रथेच्या छळातून मुक्त केले. त्यामुळे मुस्लिम भगिनी माझे कौतुक करू लागल्या आहेत आणि त्यामुळेच व्होटबँकेचे काही ठेकेदार अस्वस्थ होतात. त्यांच्या पोटात दुखू लागते’ आश्या शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांना फटकारले.  पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे मोदींची आज पहिली जाहीर प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तीन तलाक कायद्याचा उल्लेख करत मुस्लिम मतांचे राजकारण करणाऱ्या पक्षांवर टीका केली. मी केलेले कायदे हे मुस्लिम स्रीयांना फायदेशीर ठरले असून काही लोकांच्या पोटात लगेच दुखायला लागले आहे.

मुस्लिम माता-भगिनी आणि लेकींना त्यांचे हक्क मिळू नयेत म्हणून अनेक मार्गांनी अडथळे आणले जात आहेत. मात्र, या प्रवृत्तीला आम्ही थारा दिलेला नाही. मुस्लिम महिलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेतला. उत्तर प्रदेशातील मुस्लिम भगिनींनाही माझे आवाहन आहे. तुम्हाला सुरक्षित वातावरण हवं असेल. जाचातून मुक्ती हवी असेल तर येथे योगी सरकार आवश्यक आहे, असेही आज मोदी प्रचार सभेत म्हणाले.

      महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!