Share

पंतप्रधान मोदींचे ‘मिशन व्हॅक्सिन’; ‘कोविशिल्ड’ लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी असणार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेण्यासाठी काल सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. दरम्यान ‘सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये तयार करण्यात येणारी कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लस ही देशात पहिल्यांदा वितरित केली जाणार आहे. या लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी असणार आहे,’ असे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.

दरम्यान, ‘कोविशिल्ड’ लसीचा आत्पकालीन स्थितीत वापर करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून येत्या दोन आठवडय़ांत अर्ज करणार आहोत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज चर्चा झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सीरम इन्स्टिटय़ूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अदर पूनावाला म्हणाले, ‘लसीबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली. लसनिर्मितीच्या प्रकियेबाबत मोदी यांनी सविस्तर माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.’लसीबाबतचा अंतिम निर्णय देशाचे आरोग्य मंत्रालय घेणार आहे.

‘कोविशिल्ड’ लस सीरम इन्स्टिटय़ूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, कार्यकारी संचालक नताशा पूनावाला यांनी ‘सीरम’ने आतापर्यंत तयार केलेल्या विविध लसींची माहिती मोदी यांना दिली. कोरोनाच्या लसीवर काम करणारे संशोधक, वैज्ञानिक आणि वरिष्ठ अधिकाऱयांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला.

त्यात लसनिर्मिती, साठवणुकीची तयारी आणि नागरिकांपर्यंत लस कशी पोहोचवायची, यावरही चर्चा केली. अदर पूनावाला यांनी मोदी यांना ‘सीरम’च्या कार्यपद्धतीची माहिती दिली. सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये ऑक्सफर्डची कोरोना व्हॅक्सिन ‘कोविशिल्ड’ची निर्मिती केली जात आहे. या लसीची परिणामकारकता चांगली आहे. त्यामुळे या लसीकडे जगाचे लक्ष लागले आहे.

‘कोविशिल्ड’ लस पूर्णपणे सुरक्षित ‘कोविशिल्ड’ लस पूर्णपणे सुरक्षित असून, तिच्या तिसऱया चाचणीकडे लक्ष आहे. ‘कोविशिल्ड’ लस घेतल्यानंतर लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही, शिवाय या लसीमुळे कोरोनाचे संक्रमणही रोखण्यात येईल’ असे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’सह अहमदाबाद येथील स्वदेशी कोरोना व्हॅक्सिन ‘झायकोव्ह-डी’ची ट्रायल करीत असलेली पंपनी झायडस पॅडिला पेंद्र आणि हैदराबाद येथील भारत बायोटेकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. या भेटीत त्यांनी लसनिर्मिती प्रकिया, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रकियेचा आढावा घेतला. पहिल्यांदा देशात वितरित केली जाणार आहे. त्यानंतर इतर देशांत लसपुरवठा केला जाणार आहे. त्यात प्रामुख्याने आफ्रिकन देशांचा समावेश आहे. ब्रिटनसह युरोपमध्ये लस वितरणाची जबाबदारी अॅस्टाझिनेका आणि ऑक्सपर्ह्ड यांची असणार आहे.

पुणे, अहमदाबाद, हैदराबाद येथील भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून वैज्ञानिक आणि संशोधकांचे अभिनंदन केले आहे. लसीचे निर्माण, चाचण्यांविषयी प्रगती आणि भविष्यातील करावयाच्या उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती घेतली. लसनिर्मितीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये केंद्र सरकार वैज्ञानिकांसोबत आहे, असेही पंतप्रधानंनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!