🕒 1 min read
हैद्राबाद : महापालिका निवडणुकीमुळे हैदराबादमधील राजकीय वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैद्राबाद मध्ये आहेत.
प्रचारादरम्यान त्यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याचं आश्वासन दिलं. योगी आदित्यना यांनी शनिवारी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी येथे रस्त्यावर प्रचार केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले.
योगी प्रचारादरम्यान म्हणाले, “इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांना म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?”
#WATCH | Some people were asking me if Hyderabad can be renamed as Bhagyanagar. I said – why not. I told them that we renamed Faizabad as Ayodhya & Allahabad as Prayagraj after BJP came into power in UP. Then why Hyderabad can't be renamed as Bhagyanagar?: UP CM Yogi Adityanath pic.twitter.com/hy7vvSLH0z
— ANI (@ANI) November 28, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘रावसाहेब दानवे शुद्ध तुपातले आहेत का?’; ईडी चौकशीवरून बच्चू कडूंचा सवाल
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- ‘पुणेकरांनी बनवलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये’ : सुप्रिया सुळे
- धक्कादायक : सद्यस्थितीत भारतातील 70% कोरोनाचे सक्रीय रुग्ण ‘या’ राज्यांमधून
- कोरोना साथीनंतरही ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार : एम. वेंकैया नायडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

