Share

5G Launch | 5G लाँच च्या वेळी पंतप्रधान मोदींनी घातला ‘हा’ अनोखा चष्मा

Published On: 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी देशात 5G सेवा सुरू केली. मोदींनी नेहमीच्या आपल्या हटके अंदाजाने यावेळीही सर्वांना चकित केले. मोदींनी आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या पेहराव्यात कार्यक्रमांना हजेरी लावली होती अगदी तशीच या कार्यक्रमाला सुद्धा लावली. या कार्यक्रमात मोदींनी घातलेला खास चष्मा सर्वांच्या आकर्षणाचे कारण ठरला.

5G नेटवर्कच्या लाँचपूर्वी PM मोदी IMC 2022 च्या पवेलियन मध्ये जाऊन विविध 5G उपकरणांची माहिती घेत होते. या उपकरणांमध्ये या अनोख्या चष्म्याचा समावेश होता. या चष्माचा डेमो देत मुकेश अंबानींनी हा चष्मा पंतप्रधान मोदींना परिधान करण्यास दिला. यानंतर खुद्द पंतप्रधान मोदींनी हा Jio Glass घालून त्याचा अनुभव घेतला.

जाणून घेऊया या खास चष्मा बाबत

मोदींनी घातलेला खास चष्मा Jio Glass (जिओ ग्लास) म्हणून परिचित आहे. या चष्म्याचा वापर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणून देखील केला जातो. स्मार्ट वाॅच, टॅबलेट, मोबाईल, लॅपटॉप या डिव्हाइसना जोडता येण्याची क्षमता चष्म्यामध्ये आहे. हा खास चष्मा 2 डी आणि 3 डी दृश्य पाहण्यासाठी देखील वापरला जातो. या चष्म्यात अंतर्गत साऊंड सिस्टीम देखील उपलब्ध आहे.

रिलायन्स समूहाकडून या चष्म्याचे सर्व फीचर स्पष्ट करण्यात आले आहेत. शैक्षणिक तसेच मनोरंजनासाठी हा चष्मा उपयुक्त ठरणार असल्याचे रिलायन्सकडून सांगितले जात आहे. या चष्म्यातून 50 अंशातील प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसण्याचा दावा देखील रिलायन्सकडून करण्यात आला आहे.

मोदींनी घातलेला हा चष्मा सध्यातरी बाजारात उपलब्ध नसला तरी रिलायन्सकडून लवकर हा चष्मा बाजारात लॉंच करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!