🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटामध्ये सध्या दसरा मेळावा वरुन जोरदार वाद सुरु आहे. या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतली असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंसह उद्धव ठाकरेंना देखील सुनवालं आहे.
शरद पवार यांनी दसरा मेळावा वरुन सुनावलं :
एका पक्षाचे दोन भाग झाले आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चालवलं गेलं, या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नासल्याच शरद पवार यांनी म्हटल आहे.
राज्यात जबाबदार लोक आहेत, त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकायला हवीत आणि ही पावलं टाकण्याची जबाबदारी आमच्या सारख्या सिनियर लोकांवर असेल, त्यापेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे, यातून अपेक्षा अशी करूया की, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल, असं देखील शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांनाच :
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांबाबत देखील भाष्य केलं आहे. शिवसेना आमदार रमेश लाटके यांच्या निधनामुळे अंधेरीतील जागेसाठी निवडणुका होणार आहेत, यामध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा उद्धव ठाकरेंनाच असेल, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule । अजितदादांनी सत्तेत येण्याचं स्वप्न बघू नये ; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला
- Viral Video | फुग्यासोबत खेळणाऱ्या या दोन क्युट मांजरी, पाहा व्हिडिओ!
- Eye Care Tips | नजर कमी होतेय? तर करा हे घरगुती उपाय
- Eknath Khadse | “माझ्यासोबत राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता शहांना भेटणार”; एकनाथ खडसेंचं मोठं विधान
- CM Eknath Shinde | “गोव्यावरुन एक जरी दारुची बाटली महाराष्ट्रात आणली तर…”, शिंदे सरकारचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
