Share

Chandrashekhar Bawankule । अजितदादांनी सत्तेत येण्याचं स्वप्न बघू नये ; चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

Published On: 

मुंबई : सातारा जिल्ह्यातील मार्डीमध्ये माजी आमदार स्वार्गीय सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी अजित पवार (ajit Pawar) यांनी कुणाच्याही दबावात कुणाला त्रास देऊ नका, आम्ही कधी सत्तेत येऊ कळणार नाही, असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलंय. “अजित पवार यांना स्वप्न पडायला लागले आहेत, आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत, अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवलं, अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासाला खिळ बसली, त्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सत्तेमधील येण्याची स्वप्ने बघू नये,” असे बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आमच्याकडे सर्व संस्था होत्या. मात्र, आम्ही सत्तेचा माज केला नाही. आज जे सुरू आहे ते सर्व गलिच्छ राजकारण असल्याचं अजित पवार म्हणाले होते. यावर बावनकुळे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. यावरुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, “नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल माहिती नाही, फडणवीस यांचे काही प्रायव्हेट व्यवसाय नाही, ते पूर्ण वेळ 18 तास जनसेवेसाठी देतात, त्यामुळे ते सहा नाही तर आठ जिल्हे सांभाळू शकतात असं बावनकुळे यांनी यावेळी बोलतांना म्हंटल आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाना पटोले यांनी बोलणं म्हणजे सूर्यासमोर दिवा दाखवण्यासारखे आहे असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. नाना पटोले गोंधळलेले आहेत, त्यांचा बॅलन्स सुटला आहे, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे ते असे वक्तव्य करतात, असंही बावनकुळे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, यावर देखील बावनकुळे यांनी भाष्य केलंय. “मुख्यमंत्र्यांच्या धमकीसंदर्भामध्ये सरकार योग्य ती कार्यवाही करत असल्याचं ते म्हणाले. पीएफआय सारख्या संघटनेवर बंदी आणणे म्हणजे भारताला वाचवणे आहे, या संघटनेने भारतामध्ये ज्या पद्धतीने आपले जाळे पसरून टार्गेट करायचे अशा संघटनांना यापूर्वीच बंदी घालायला हवी होती, पण आता योग्य काम झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस सरकारच्या काळात या संघटना फोफावल्या, या संघटनेच्या लोकांना जिथे मिळेल तिथे झोडून काढले पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकारने सर्वच धर्मांच्या सणांना निर्बंध मुक्त केले, त्यामुळे गेल्या वीस वर्षात उत्साहाने हे सण साजरे झाले नाही, तेवढा उत्साह यंदा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला होता. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकाना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!