Share

औरंगाबाद येथील घटनेची PM मोदींनी घेतली दखल, तर रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केली हळहळ

Published On: 

नवी दिल्ली : औरंगाबादमध्ये जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेले आहेत.

शुक्रवारी पहाटे ५.१५ ही दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. यात २ मजूर गंभीर जखमी असून, तिघे जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.

या घटनेची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेतली आहे. तर याबात रेल्वेला काही सूचना दिल्या आहेत. याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहील आहे की, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक मदत केली जाईल.

तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देखील याबाबत ट्विट केले आहे. आज पहाटे ५.२२ वाजता नांदेड डिव्हिजनच्या बदनापूर व करमाड स्टेशनजवळ काही कामगारांचा मालगाडीच्या खाली येऊन अपघात झाल्याची दुःखद बातमी समजली आहे. बचावकार्य सुरू असून, रेल्वे अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले आहेत. मृतांच्या आत्म्यांना ईश्वर शांती देवो, यासाठी प्रार्थना करतो, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत.

दरम्यान या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, ‘जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या अपघातात धर्मेंद्र सिंह(२०), ब्रिजेंद्र सिंह(२०), निर्बेश सिंह (२०), धन सिंह (२५), प्रदीप सिंह, राज भवन, शिव दयाल, नेमसहाय सिंह, मुनिम सिंह, बुधराज सिंह, अचेलाल, रविंद्र सिंह या मजुरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

‘लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या, गावी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार’

आरोग्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा; रुग्णालयांनी रुग्णांकडून भरमसाठी फी आकारली तर…

जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण….

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!