मुंबई : ‘रुग्णालयांनी रुग्णांकडून भरमसाठी फी आकारली तर त्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल,’ असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजार 162 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करत आहे, याबाबतही माहिती दिली.
यावेळी बोलताना टोपे म्हणाले, ‘अनेक रुग्णालये रुग्णांकडून वेगवेगळ्या पद्धतीने चार्जेस घेतात. रुग्णांकडून कुणी 1 लाख तर कुणी 50 हजार दररोज चार्जेस घेत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मात्र, रुग्णांकडून असे भरमसाठ चार्जेस घेणं हे कधीही चालणार नाही. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या कायद्यांचा विचार करुन आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक निर्णय घेण्यात आला आहे’.
दरम्यान, ‘कोरोनाबाधितांचा संख्या बघून घाबरु नका. संख्या तेवढी वाढलेली नाही. पण दुर्लक्षही करु नका. लोकांनी स्वत: हून समोर यावं, जेणेकरुन लवकर उपचार करता येईल,’ असं राजेश टोपे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
