Share

जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण….

Published On: 

मुंबई :- राज्यात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी परप्रांतीय मजूरांच्या मुद्यांसह काही महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आहे ? अगदी आयत्यावेळी सांगून जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही’.

तसेच ‘शैक्षणिक वर्ष आता काही दिवसात सुरु होणार आहे तेव्हा शाळा कशा आणि कधी सुरु होणार? ह्यांची स्पष्टता सरकारतर्फे येणं आवश्यक आहे जेणेकरून पालकांची चिंता कमी होईल,’ अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!