टीम महाराष्ट्र देशा :घसरता भूजल स्तर वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन योजना सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा केली.
विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात मोदींनी अटल भूजल योजनेची घोषणा केली. मोदी म्हणाले, “एकीकडे जल जीवन मिशन प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहचवणार आहे. त्याचप्रमाणे अटल भूजल योजना असेल. ज्या क्षेत्रामध्ये भूजल स्तर खुप खालावलेली आहे, त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करेल,” असं मोदी योजनेची घोषणा करताना म्हणाले.
महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये अटल भूजल योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत करण्यात आला. देशात पेयजल आणि सिंचन यासाठी भूजलावरील अवलंबित्व मोठं आहे. अटल भूजल योजनेद्वारे भूजलाच्या वापरावर देखरेख ठेवण्यासोबत, त्याचं शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी, संस्थात्मक व्यवस्था बळकट करण्याचा उद्देश आहे. यासाठी राज्यांना अंशदान स्वरुपात 5 वर्षांच्या कालावधीत, सहा हजार कोटी रुपये देण्यात येतील.
दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरा केला जात आहे. जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांनी सदैव अटल स्मतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.
महत्वाच्या बातम्या :


