नवी दिल्ली : गेले अनेक दिवस देशामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन कसा हाताळाल याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना केली आहेत. सोमवरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीतील चर्चेद्वारे लॉकडाउन वाढण्याचे संकेतही मिळाले आहेत.
आपापल्या राज्यांमध्ये लॉकडाउन कसा हाताळणार याची व्यापक रणनीती तयार करा आणि त्याची माहिती १५ मे पर्यंत द्या अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना बैठकी दरम्यान केल्या. तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन कायम ठेवत त्याची मुदत 31 मे करावी अशी मागणी केली.
तामिळनाडू, तेलंगण, छत्तीसगड, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवासी रेल्वे सुरू करण्यास विरोध करत लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची सूचना केली. लॉकडाउन उठवण्याबाबत ठोस धोरण आणि दिशा हवी, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.
पंजाबने लॉकडाउन कायम ठेवण्याचा पण, आर्थिक व्यवहारांना हळूहळू वेग देण्याची भूमिका घेतली. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सुट देण्यात आली होती. तसंच लॉकडाउनचा चौथा टप्पा लागू झाल्यास त्यात आणखी काही सुट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीदरम्यान याबाबत संकेत दिले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिरदर सिंग यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याची मागणी केली. लॉकडाउन कसं शिथिल करायची हे राज्यांनी ठरवलं पाहिजे. लोकांचं जगणं आणि रोजगार देण्याची जबाबदारी राज्यांकडे असल्यानं त्यांना अधिक आर्थिक मदत दिला गेली पाहिजे, अशीही सूचना अमिरदर सिंग यांनी केली.
करोनाचा प्रादुर्भाव कदाचित मे, तसेच जून-जुलैमध्येही मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो. चीनमधील वुहानमध्ये करोनाची दुसरी लाट आलेली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही इशारा दिलेला होता. त्यामुळे लॉकडाउन उठवण्यासंदर्भात अत्यंत काटेकोरपणे निर्णय घेतला पाहिजे, असे उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले.
देशाच्या विविध भागांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू झाले असून, येत्या काळात ते अधिक गतीने होऊ लागतील. पण, आर्थिक व्यवहारांना चालना देतानाच करोनाविरोधातील लढाई कमकुवत करून चालणार नाही. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिसऱ्यांदा लागू केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १७ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनबाबत कोणता निर्णय घ्यायचा तसेच, आर्थिक विकासाला अधिक वेग कसा द्यायचा या मुद्दय़ावर प्रामुख्याने मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या
आम्हाला आमच्या गावी जाण्याची इच्छा नाही, 350 मजुरांनी जाण्यस दिला नकार !
पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राने मनुष्यबळ पुरवावे : CM ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

