पुणे : एकीकडे मजूर आपल्या गावी जाण्याचा हट्ट करत असतानाच ग्रामीण भागातील मजुरांनी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता ज्यांची जाण्याची इच्छा नाही त्यांना पाठविण्यात आलेले नाही, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. ग्रामीण भागात उद्योग सुरु होऊ लागल्याने अनेक मजुरांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्यास नकार दिला आहे.
करोनाच्या सध्यस्थितीची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी राम यांनी व्हिडिंओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी राम म्हणाले,‘आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ४२१ मजूर हे मूळगावी गेले आहेत. सरासरी दोन ते तीन रेल्वे गाड्यांनी या लोकांना घरी पाठविण्यात येत आहे. ग्वालियर, इलाहबाद, हरिद्वार, जबलपूर, जोधपूर येथे रेल्वे गाड्या गेल्या आहेत. राजस्थान सरकारने प्रस्ताव मान्य केला आहे. बिहार राज्याकडे दहा प्रस्ताव प्रलंबित आहेत. आणखी २३ ते २४ रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत या गाड्या जाऊ शकतील.
सर्वच मजुरांना मूळ गावी पाठविण्याचा हेतू नाही. दौंडमध्ये ३०० मजुरांनी काम उपलब्ध असल्याने मूळ गावी जाण्यास नकार दिला आहे. सोमवारी उत्तरांचल येथे गेलेल्या रेल्वे गाडीतील ४० ते ५० मजुरांनी जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना तो पर्याय देण्यात आला आहे. ग्रामीण भागात उद्योग सुरू होऊ लागले आहेत. तेथील बंधने हे शिथिल केल्याचा हा परिणाम आहे, असे नवल किशोर राम म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
….म्हणून राज्यकर्त्यांनी आधी करोनाच्या तिरडीवरून उठावं – शिवसेना
मोदींसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ प्रमुख मागण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

