मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस यंत्रणांना विश्रांती देण्याच्या मुद्यावर चर्चा केली. तसेच लॉकडाऊनमध्येही वाढ करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे. ते आजारी पडून चालणार नाही त्यामुळे आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल, असा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडला.
तर केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल असही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विशेष करून पोलीस यंत्रणा आता पूर्णपणे थकली आहे. त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्राने अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे जेणेकरून पोलिसांना विश्रांती देण्यात येईल.
दरम्यान कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असलेल्या 88 पोलीस अधिकार्यांसह 698 अंमलदार अशा एकूण 786 पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 7 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून 13 अधिकार्यांसह 63 अंमलदार असे एकूण 76 पोलीस उपचारांअंती कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 75 अधिकार्यांसह 628 अंमलदार अशा एकूण 703 कर्मचार्यांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
….म्हणून राज्यकर्त्यांनी आधी करोनाच्या तिरडीवरून उठावं – शिवसेना
मोदींसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ प्रमुख मागण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

