Share

तणाव वाढला : मोदींच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक

Published On: 

नवी दिल्ली : लडाख सीमेवरुन भारत-चीन या दोन देशात तणावाचे वातावरण आहे. चीनकडून भारताला डिवचण्याचे काम सुरु आहे. मात्र आता चीनला चांगलाच धडा शिकविण्यासाठी मोदी सरकराने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सीमा वादानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर चीनच्या काही उत्पादनावर कस्टम ड्यूटी वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंना आळा बसेल. दरम्यान, यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी आयात वस्तूंवर शुल्क वाढविण्याबाबत चर्चा चालू आहे.

दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोनिया गांधी (काँग्रेस), जेपी नड्डा (भाजप), ममता बॅनर्जी (तृणमूल कॉंग्रेस) एमके स्टालिन (द्रमुक), एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि ओ. पन्नेरसेल्वम (एआयएडीएमके), एन चंद्रबाबू नायडू (टीडीपी), जगन मोहन रेड्डी (वायएसआर कॉंग्रेस), नितीश कुमार (जद-यू). अखिलेश यादव (समाजवादी पार्टी), डी.राजा (सीपीआय), सीताराम येचुरी (सीपीएम), नवीन पटनायक (बीजद), के. चंद्रशेखर राव (टीआरएस), सुखबीर बादल (अकाली दल), चिराग पासवान (लोक जनशक्ती पार्टी), हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा) या नेत्यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे.

मोदी सरकार देणार चीनला जोरदार झटका, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लडाखमधील भारत-चीन सीमेच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी पक्ष आहे असंही आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

दरम्यान, चीनविरोधात सरकार कडक पावले उचण्याबाबत विचार करत आहे. याआधी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. चीन कंपनीबरोबरचा ४७१ कोटींचा करार रद्द केला आहे. गलवान खोऱ्यात २० सैनिक शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात चीन विरोधी वातावरण तयार झाले आहे. तसेच संताप व्यक्त होत आहे. यातूनच चीनच्या उत्पादनावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

विधानपरिषद निवडणूक : संघटनेतील फुटीवरून स्वभिमानीच्या प्रदेशाध्याक्षांच मोठ विधान…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!