Share

मोदी सरकार देणार चीनला जोरदार झटका, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Published On: 

नवी दिल्ली : लडाख सीमेवरुन भारत-चीन या दोन देशात तणावाचे वातावरण आहे. चीनकडून भारताला डिवचण्याचे काम सुरु आहे. मात्र आता चीनला चांगलाच धडा शिकविण्यासाठी मोदी सरकराने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सीमा वादानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर चीनच्या काही उत्पादनावर कस्टम ड्यूटी वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंना आळा बसेल. दरम्यान, यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी आयात वस्तूंवर शुल्क वाढविण्याबाबत चर्चा चालू आहे.

भारत एकूण आयात केले जाणाऱ्या वस्तूंपैकी १४ टक्के हिस्सा चीनचा आहे. एप्रिल २०१९पासून फेब्रुवारी २०२० रोजी भारताने चीनकडून ६२.४अब्ज डॉलर किंमतीची सामग्री आयात केली आहे. तर १५.५ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. चीनमधून आयात केलेल्या वस्तूंमध्ये मुख्य वस्तूंमध्ये घड्याळ, संगीत साधने, खिळनी, खेळाचे साहित्य, वस्तू, गाद्या, प्लास्टिक, इलेक्ट्रिकल मशीनरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायन, लोखंड आणि लोखंडी साहित्य, खनिज ईंधन आणि धातूंचा समावेश आहे. यावर आयात शुल्क वाढवण्याबाबत विचार सुरु आहे. जर आयात शुल्क वाढविले तर ‘मेक इन इंडिया’ च्या विकासाला अधिक चालना मिळेल.

विधानपरिषद निवडणूक : संघटनेतील फुटीवरून स्वभिमानीच्या प्रदेशाध्याक्षांच मोठ विधान…

चीनविरोधात सरकार कडक पावले उचण्याबाबत विचार करत आहे. याआधी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. चीन कंपनीबरोबरचा ४७१ कोटींचा करार रद्द केला आहे. गलवान खोऱ्यात २० सैनिक शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशात चीन विरोधी वातावरण तयार झाले आहे. तसेच संताप व्यक्त होत आहे. यातूनच चीनच्या उत्पादनावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!