मुंबई : जून मध्यापासून भारत-चीन सीमेवरील पार्श्वभूमीवर सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लेह मधील सैनिकी बेस वर हजेरी लावली. त्यानंतर त्यांच्याही संवाद झाल्यानंतर गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता देखील त्यांनी व्यक्त केली असून चीनसोबतच पाकिस्तान ला देखील इशारा दिला आहे. आता विस्तारवादच युग संपलं असल्याचं देखील त्यांनी खडसावून सांगितलं आहे. मोदींनी केलेल्या या अचानक दौऱ्याचे सर्वत्र कौतुक होत असून राज्यात मात्र भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे.
आता विस्तारवादाचं युग संपलं; पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा
देशाचे PM लेह युध्दभुमीवर पोहचले, पण महाराष्ट्राचे Best CM कोकणात देखील नाही जाऊ शकले!!!
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 3, 2020
भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी, ‘ देशाचे PM लेह युध्दभुमीवर पोहचले, पण महाराष्ट्राचे Best CM कोकणात देखील नाही जाऊ शकले ‘ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसामुळे कोकणातील अनेक घरांची पडझड झाल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले होते. आंबा, नारळासह शेती-वाडीचे देखील नुकसान कोकणात झाले होते. सरकारने केलेली मदत अजून देखील कोकणात पोहोचलेली नाही. आधीच कोरोना मुळे असलेल्या लॉकडाऊन मुळे कोकणवासी त्रस्त असताना या वादळामुळे झालेल्या नुकसानाने हतबल झाल्याचे दिसून येत होते. तर कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जेव्हा इंदिरा गांधी लेहला गेल्या होत्या, तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते- कॉंग्रेस
मागील महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात निसर्ग या चक्रीवादळाने तडाखा दिला होता. अपेक्षित असलेला वादळाचा मार्ग बदलून मुंबई ला हुलकावणी देत कोकणात मात्र प्रचंड नुकसान या वादळाने केले होते. भाजपकडून राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या मदतीवर सुरुवाती पासून टीका केले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

