Share

जेव्हा इंदिरा गांधी लेहला गेल्या होत्या, तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते- कॉंग्रेस

Published On: 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहचा दौरा केला. यावेळी जवानांशी संवाद साधताना मोदींनी चीनला थेट इशारा दिला. गेल्या काही काळात विस्तारवादानंच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी चीनला इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेचा आढावा घेण्यासाठी लडाख दौरा केला. मीडियाला कसलीही कुणकुण लागू न देता मोदींनी हा दौरा केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लडाख जवळील निमू भागाचा दौरा करत सैनिकांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचं मनोबलही वाढवलं.

जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानंचं मानवतेचा विनाश करण्याचं काम केलं. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. सपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटलं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारे लडाखला पोहोचल्याच्या बातमीने विरोधी पक्ष देखील कोड्यात पडले आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 1971 च्या युद्धापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो शेअर केले होते. या चित्रात इंदिरा गांधी लेहमधील सैनिकांना संबोधित करत आहेत. या फोटोसह कॉंग्रेस नेत्याने लिहिले की, ‘जेव्हा इंदिरा गांधी लेहला गेल्या होत्या, तेव्हा पाकिस्तानला दोन भागात विभागले होते, आता पाहूयात ते (मोदी) काय करतील’? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची पहिली भेट ‘अशी’ झाली होती…

मुख्यमंत्री म्हणतात… कोरोनाच्या संकटामुळे बदलणाऱ्या अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिके घ्या

यालाच म्हणतात प्रखर …जबर…राष्ट्रप्रेम, नितेश राणेंचे पंतप्रधानांवर स्तुतिसुमने

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!