Share

आता विस्तारवादाचं युग संपलं; पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा

Published On: 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहचा दौरा केला. यावेळी जवानांशी संवाद साधताना मोदींनी चीनला थेट इशारा दिला. गेल्या काही काळात विस्तारवादानंच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी चीनला इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर सीमेचा आढावा घेण्यासाठी लडाख दौरा केला. मीडियाला कसलीही कुणकुण लागू न देता मोदींनी हा दौरा केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लडाख जवळील निमू भागाचा दौरा करत सैनिकांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचं मनोबलही वाढवलं.

जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानंचं मानवतेचा विनाश करण्याचं काम केलं. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. सपूर्ण जग आज विस्तावादा विरोधात एकवटलं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

ऐकावं ते नवलचं, या ‘गोल्डन मॅन’ने चक्क बनवला सोन्याचा मास्क

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला – संजय राऊत

पत्नीला 192 कोटी रुपयांची पोडगी देण्यासाठी या’ दिग्गज खेळाडूला करावी लागणार नोकरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!