मुंबई: कोरोना नंतर महागाई आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना सामान्यांना कसरत करावी लागत असताना इंधनांची दरवाढ देखील लागोपाठ सुरूच आहे. आज पुन्हा इंधनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज देश 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशीही देशात पेट्रोल महागलेलं होते. तर, आज सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत मंगळवारी पेट्रोलच्या दरात तब्बल 35 पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी वाढले आहेत, मुंबईत 34 पैसे, कोलकात्यात 34 पैसे आणि चेन्नईत 31 पैशांनी वाढले आहेत.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 86.05 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 92.62 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 87.45 रुपये प्रति लीटर असेल. तर दिल्लीत डिझेलचा दर 76.23 रुपये प्रति लीटर असेल. तर मुंबईत 83.03 रुपये प्रति लीटरने डिझेल विकलं जाणार आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. त्यानुसार सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात ठरवून दिलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल. तर यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे आणि कालचे पेट्रोलचे दर पुढील प्रमाणे आहेत. औरंगाबाद 92.50, 93.49, धुळे 92.68, 92.51, गडचिरोली 93.86, 93.28, ग्रेटर मुंबई 92.32, 92.34, जळगाव 93.22, 92.44, कोल्हापूर 92.58, 92.57, मुंबई 92.28, 92.28, नागपूर 92.30, 92.24, परभणी 94.74 94.61, पुणे 92.14 92.70 रुपये लिटर याप्रमाणे होते.
महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन
- “उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाचा अवमान करू नका अशी मनापासून विनंती”
- आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर !
- दिल्लीत ‘जय जवान, जय किसान!’ जवानांच्या परेडनंतर शेतकऱ्यांची भव्य ट्रॅक्टर परेड
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शेतकऱ्यांच्या हिताची ग्वाही !

