Share

आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर !

Published On: 

नागपूर : आजच्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी १ हजार ९१४ हेक्टरवर पसरलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उदघाटन आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री नागपुरात दाखल होणार असून चार वाजता हा उदघाटन कार्यक्रम पार पडणार आहे.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानं हे विदर्भातील नवं पर्यटन स्थळ ठरणार आहे. उद्घाटनानंतर भारतीय सफारी नागरिकांसाठी सुरु होणार आहे. 40 आसन क्षमतेच्या एसी बसमधून नागरिकांना सफारीचा आनंद लुटता येणार आहे.

भारतीय सफारीसाठी वाघ, अस्वल, बिबट आणि तृणभक्षी प्राणी सोडण्यात आलेत पुढच्या टप्प्यात आफ्रिकन सफारी, बर्ड सफारी, नाईट सफारीचे नियोजन करण्यात आले आहे. इंडियन सफारीचे दर पण तुलनेत कमी असून सोमवार ते गुरुवार बेंझ एसी बसचे दर 300 रुपये आणि 400 रुपये आयशर एसी बससाठी आहेत. सध्या दोन्ही बस दरांमध्ये 20 टक्के सुट देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!