मुंबई : देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, कोरोना महामारीनंतर प्रथमच तिरंग्याला सलामी देण्यासाठी देशवासीय एकत्र येत आहेत. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचाही कार्यक्रम कमी लोकांमध्येच साजरा होत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणेच उत्साह आणि देशभक्तीमय वातावरण देशभर पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी क्रीडाक्षेत्रातून देखील नागरिकांपासून ते जवानांपर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. यातच भारताचा माजी महान क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच बरोबर त्याने यावेळी नागरिकांना उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजा अवमान करू नका असा संदेश देखील दिला आहे.
May the sun in his course visit no land more free, more happy, more lovely, more prosperous than our own Bharat.
Earnest request to not throw away the flags after celebration. #HappyRepublicDay2021 Jai Hind ???????? pic.twitter.com/R7o3VDTlE4
— Virender Sehwag (@virendersehwag) January 26, 2021
देशभरात गावपातळीपासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. दिल्लीच्या राजपथावरही प्रजासत्ताक दिनाचा मोठा सोहळा पार पडत आहे. कोरोनामुळे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, भारतीय सैन्य दलाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोणी कितीही भुंकले तरी फरक पडत नाही; कॉंग्रेस आमदाराचा शिवतारेंना टोला
- अभिमानास्पद ! राज्यातील ५७ शूर पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान
- ‘अनाथांची माई’ सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
- लोककला जपणाऱ्या कोकणातील परशुराम गंगावणे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर !
- जय हिंद…पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

