Share

दिल्लीत ‘जय जवान, जय किसान!’  जवानांच्या परेडनंतर शेतकऱ्यांची भव्य ट्रॅक्टर परेड

Published On: 

मुंबई : यावर्षीचा प्रजासत्ताकदिन वैशिष्टय़पूर्ण असणार आहे. आज राजपथावर हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला होईल. जवानांच्या भव्य परेडनंतर लाखो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड दिल्लीत होणार असून, देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमणार आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लष्करी छावणीचे रूप आले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोदी सरकारने मनमानी पद्धतीने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी दोन महिन्याहून अधिक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर शेतककऱ्यांची ठाम भूमिका आहे.

अशी असणार ट्रॅक्टर परेड सिंघू-टिकरी आणि गाझीपूर सीमेवरून हजारो ट्रॅक्टर्स घेऊन शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करतील. ट्रॅक्टरवर राष्ट्रध्वज तिरंगा असेल तसेच देशभक्तीपर गीते लावण्यात येणार आहेत. ट्रॅक्टरवर शेतकरी महिला असणार आहेत. या ट्रॅक्टर परेडपुढे शेतकरी असतील. राजपथावर प्रजासत्ताकदिनाचा मुख्य सोहळा झाल्यानंतर दिल्लीत ट्रॅक्टर परेड निघेल. सुमारे शंभर किलोमीटरची ही परेड असेल.ही परेड शांततापूर्ण असेल, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. तिन्ही सीमांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर परेडचा मार्ग निश्चित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!