🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने खास रणनीती तयार केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून त्यापैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलं आहे.
दरम्यान, शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे बंगालच्या नाडिया जिल्ह्यात एका भिंतीवर चक्क नागरिकांना धमकी देणारी एक सूचना लिहिण्यात आलेली दिसली.
‘तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील’ असं बंगाली भाषेत लिहिलेल्या या सूचनेत म्हटलं गेलंय. ही आक्षेपार्ह सूचना नेमकी कुणी लिहिली, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींनी गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट; कॉंग्रेसला मिरच्या झोंबल्या
- साध्वी प्रज्ञा सिंह यांची तब्येत बिघडली; एम्समध्ये दाखल
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच जगतापांवर सोपविली पक्षाने मोठी जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
