भिवंडी : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी बाहेर राहत आहे.
याच पार्श्वभूमीवर भिवंडी शहरात कोरोनाचा शिरकाव न होण्यासाठी भिवंडी महानगरपालिका प्रशासनातर्फे काल आदर्श पार्क, अजय नगर येथे औषध फवारणी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नगारिकांनी स्वच्छता कर्माचाऱ्यांसाठी खिडकीतून टाळ्या वाजवत कर्माचाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांचे स्वागत केले.
महानगरपालिकेचे सभागृह नेते विलास पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्याची विनंती परिसरातील नागरिकांना केली. विलास पाटील यांच्या विनंतीनंतर सर्व इमारतींच्या खिडक्यांमधून महिला पुरुषांनी जमा होत आगळे वेगळे अभिनंदन केल्याने सफाई कर्मचाऱ्यांना देखील आनंद झाला.
दरम्यान, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अशा परिस्थितीत मनपाचे सफाई कामगार हे शहर स्वच्छतेसोबतच शहरातील प्रत्येक रस्त्यावर गल्लीबोळात जंतुनाशक औषध आणि धूर फवारणीचे काम करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

