टीम महाराष्ट्र देशा : आज १ मे महाराष्ट्र दिन. देशभरातून महाराष्ट्राच्या जनतेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देत जनतेने गाफील राहू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीटर एक पत्रक प्रसिद्ध करत जनतेला शुभेच्छा देत महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ आणि बेरोजगारीविषयी चिंता व्यक्त केली आहे. “दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेवून आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत, तिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की, तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उबारायला हवा. आणि त्यासाठी ‘महाराष्ट्र दिन’ याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, की दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका.” अस त्यांनी पत्रात नमूद केल आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती परंतु त्यांनी भाजपविरुद्ध प्रचार करून जनतेला जागरूक करण्याचे काम केले होते. राज ठाकरेंनी केलेल्या प्रचारामुळे भाजपला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन #RajThackeray #Message pic.twitter.com/plo9vg9EyD
— Raj Thackeray (@RajThackeray) May 1, 2019


