नंदुरबार/तळोदा : नंदुरबार च्या तलोद्यात काल एकाच दिवशी कोरोनाचे सात नवीन रुग्ण आढळून आले. मात्र तळोदाकराना आज त्याचा विसर पडला असावा कारण आज बाजारात कैरी खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगिंचा फज्जा उडाला.
उदे ग अंबे उदे… श्री तुळजाभवानी मंदीर खुले करण्यापुर्वी नियोजनासाठी बैठक
जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून तळोदा तालुक्याची ओळख आहे. या तलोद्यात काल एकाच दिवसात सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आता तलोद्यात कोरोना बधितांची संख्या 8 वर येऊन पोहचली आहे. दिनांक 19 ते 23 तारखेपर्यंत असे 5 दिवस तळोदा शहरात वैद्यकीय सेवा मेडिकल वगळता संचार बंदी लावण्यात आली आहे तसेच किराणा दुकान भाजीपाला विक्री व्यवसायिकांना सकाळी आठ ते एक या वेळात प्रशासन कडून मुभा देण्यात आली आहे मात्र नागरिकांनी गांभीर्य लक्षात घेतले नसल्याचे चित्र आहे.
उद्धवसाहेब…! आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय – संजय राऊत
कैरी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली यावेळी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगिंच्या नियमांचे पालन करून घेणारी यंत्रणा कुठे गेली असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. जर तलोद्यात असाच सोशल डिस्टन्सिंगिंचा फज्जा उडत राहिला तर तळोदा हे कोरोनाचे हॉटस्पॉट होण्यास वेळ लागणार नाही.


