🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आ. महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी म्हणजेचं भोसरीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. महेशदादा स्पोर्टस् फाउंडेशन, अविरत श्रमदान, सांकोसा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच आदी सामाजिक संस्था संघटनांनी याकामी सहकार्य केले आहे. त्याद्वारे पन्नास वाहनांमध्ये बसेल एवढे अन्नधान्य, औषधे, कपडे, पिण्याचे पाणी आदी जीवनोपयोगी साहित्य कोल्हापूर, सांगली तसेच कराड भागातील पुरग्रस्तांना ही मदत देण्यात आली आहे.

याबाबत आ. महेश लांडगे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगलीतील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मोठी मदतीची आवश्यकता आहे. सामाजिक भावनेतून भोसरीतील नागरिक देखील मदत करत आहेत. आज जीवनावश्यक साहित्याचे दोन टेम्पो पाठविले आहेत. आणखीन एक टेम्पो भरेल. एवढे साहित्य शिल्लक आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील कराड भागातील पूरग्रस्तांना हे साहित्य पाठविण्यात येणार आहे.

सांगलीचे सुहास पाटील यांनी भोसरीचे आ. महेश लांडगे यांच्याकडे मदत मागितली होती. आ. लांडगे यांनी तातडीने जीवनावश्यक साहित्याचे दोन टेम्पो रवाना केले आहेत. त्यामध्ये कपडे, ब्लँकेट, चादर, मेणबत्ती, खाद्यउपयोगी साहित्य, औषधे, प्रथमोपचार पेटीचा समावेश आहे. सहा ते सात गावातील ७०० ते ८०० घरांना पुरेल एवढे हे साहित्य आहे. तसेच तेथील नागरिकांनी मदत पोहचल्यावर महेश लांडगे यांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
कामातील चालढकलपणामुळे प्रशासकीय अधिका-यांना आमदार महेश लांडगे यांनी घेतले फैलावर
‘एक हात मदतीचा’ उपक्रम : पूरग्रस्तांसाठी आमदार लांडगे यांनी जपली ‘माणुसकी’!
वारक-यांनी दिली महेश लांडगे यांच्या कामाची पावती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

