🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अनेक कोकणातील चाकरमानी मुंबई – पुण्यात अडकली आहेत. या अडकलेल्या चाकरमान्यांसाठी एसटी बसची व्यवस्था करून त्यांना गावाला सोडवं अशी मागणी, भाजप नेते प्रमोद जठार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
कोरोनामुळे वाहतूक बंद असल्याने मुंबई-पुण्यात अनेक नागरिक अडकले आहेत. कोणाचे वृद्ध आई-वडील गावी आहेत. तर कोणाची लहान मुलं सुट्टीला गावी असल्याने अडकली आहेत. त्यामुळे राज्य शासनाने राज्यामध्ये वाहतूक सुरु करावी अशी मागणी नागरिकांनी काही दिवसापूर्वीच केली होती. मात्र आता भाजप नेते प्रमोद जठार यांनीही सरकारने मुंबई- पुण्यात अडकलेल्या कोकणी चाकरमान्यांसाठी बस सोडवी अशी मागणी केली आहे.
कोरोनात अडकलेल्या कोकणी माणसाकडे ठाकरे सरकारचं लक्ष आहे का ?
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याने मुंबईत अनेक कोकणवासीय अडकले आहेत. याकडे सत्तेवर असलेले ठाकरे सरकार लक्ष देत आहे का ? असा सवाल भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला आहे.
कणी माणसाचे मुंबईतले जीवन आतातर अगदीच असह्य झाले आहे. अनेक गैरसोयींमुळे त्याचा संयम सुटत चाललेला आहे. आजही कोकणी माणसांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे अशा भागात कोरोनाचा प्रसार फारसा नाही, पण अन्य विभाग व झोपडपट्टी भागातून तिथे रुग्ण आढळत आहेत. कोकणवासीय विचित्र सापळ्यात अडकले आहेत.
अशा परिस्थितीत दुर्दैवाने महामारी अधिक फैलावून “मुंबईत आमचे काही बरे-वाईट झाले तर आम्हाला पाहायला देखील कोणी असणार नाही. आमच्याकडे पैसे नसतील तरी गावाकडे पेजभात खाऊन देखील गावच्या वातावरणात अधिक सुरक्षित राहू, अशा काकुळतीच्या भावना कोकणी जनता व्यक्त करत आहे. गावाकडची अनेकांची घरे आज कुलूपबंद असल्याने त्याचीही फारशी अडचण होणार नाही, असे या कोकणी जनतेचे म्हणणे आहे, असे जठार म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

