Share

लोकलबाबत राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत : दानवे

Published On: 

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिनाभरापासून जोर धरू लागली आहे.

यातच आता राज्य सरकारने राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचा अहवाल द्यावा आणि आम्ही एका मिनिटात रेल्वे सुरू करु असं मत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलंय. राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत, असा आरोप दानवेंनी केला. त्यामुळे आगामी काळात केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या बाजूला  मुंबईत आणि आसपासच्या महानगरांमध्ये लाखो नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करु द्या, असं टास्क फोर्सनं देखील सांगितलं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये जाण्यावर बंदीच आहे. हा दुजाभाव सरकार का करतंय? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विचारला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास केला जाऊ शकतो. तर आम्हाला देखील लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.

दरम्यान,याच मुद्यावरून आता मनसेने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करुन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!