🕒 1 min read
मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी इतिहास घडवला आहे. कांस्यपदकाच्या लढाईत भारताने जर्मनीचा पराभव करत पदक पटकावले आहे. या सामन्यात भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ असा पराभव करत तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावले आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने हा विजय कोरोना योद्ध्यांना समर्पीत केला आहे. ४१ वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर मिळालेला हा विजय मी देशातील सुरु असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील योध्यांना समर्पीत करत आहे. हे कांस्यपदक सर्व कोरोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचारी यांच्यासाठी आहे. अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
Thank you to every Indian and hockey fans for the immerse love and support towards our @TheHockeyIndia team! #Tokyo2020 #Olympics #Bronze #Hockey #IndiaKaGame pic.twitter.com/zPohcqEtCV
— Manpreet Singh (@manpreetpawar07) August 5, 2021
उपांत्य फेरीचा सामना गमावल्यानंतर जर्मनीविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीला दबावात होता. जर्मनीने या सामन्यात सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफुटवर ढकलले. मात्र तिसऱ्या सत्रापुर्वी भारताने सलग दोन गोल केले. यानंतर तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत आणखी दोन गोल करत ५-३ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तरी खंडणी सरकारचे डोळे उघडावेत; भाजपची टीका
- ‘इच्छा माझी पुरी करा’ ; पतीच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठूरायाला पत्नीकडून 1 कोटींचे दान
- १०२ व्या घटनेची केंद्राने केली दुरुस्ती; आता चव्हाण म्हणतात, मराठा आरक्षणासाठी ‘हे’ देखील करा
- शिवाजीनगर भुयारी मार्ग : खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट
- शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करा, आ.चव्हाण यांनी घेतली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

