मुंबई – प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेत्री पायल घोष यांच्यावर काल अंधेरी यमुना नगर येथे अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षातर्फे करीत असून या पार्श्वभूमीवर आज रिपाइं चे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोष यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव,रिपाइं गुजराती आघाडीचे मुंबई अध्यक्ष जयंती गडा,सुनील पवार आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.अभिनेत्री पायल घोष यांच्या जीवाला धोका असून त्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी अभिनेत्री पायल घोष यांनी केली असुन रिपाइंच्या वतीने ही पायल घोष यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
अभिनेत्री पायल घोष यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध.त्यांना पोलीस संरक्षण द्यावे.आज पायल घोष यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.@CMOMaharashtra @iampayalghosh pic.twitter.com/3pAt56YNoy
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2021
अभिनेत्री पायल घोष यांनी वर्षभरापूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर आरोप करीत पोलीस तक्रार केली होती. तेंव्हा रिपब्लिकन पक्षाने पायल घोष यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे पायल घोष यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पायल घोष यांची निवड करण्यात आली होती. पायल घोष यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून चौकशी करण्याची आणि अभिनेत्री पायल घोष यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इस्लामविरोधी कंटेंट’; तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आयपीएल प्रक्षेपणास घातली बंदी
- ३५ कोटींच्या निविदा मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; सेनेच्या विरोधात भाजपा न्यायालयात जाणार
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- नरेंद्र गिरी यांना मी परवाच भेटलो होतो, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे मला धक्का बसला आहे : मौर्य
- महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या ? पोस्टमार्टमच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष


