Share

पोलीस व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्या, मंत्र्यांसाठी नवीन गाड्या कसल्या घेत आहात?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्य सरकारची आर्थीक परिस्थिती नाजूक आहे. पैसा अत्यावश्यक सेवेवर खर्च करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या साठी 25 लाख रुपये किंमतीचा गाडी खरेदीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या मान्यतेनुसार शिक्षण विभागाला वर्षा गायकवाड यांच्या साठी वाहन खरेदी करता येणार आहे.

एकीकडे कर्मचार्यांना वेतन देणे सरकारला मुश्किल झाले तसेच शाळेतील शिक्षकांनाही काही महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना मंत्र्यांच्या गाड्यांवर सरकारकडून कोट्यवधीची उधळपट्टी करण्यात येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारच्या वाहन आढावा समितीने विशेष बाब म्हणून या वाहन खरेदीसाठी परवानगी दिली आहे.

त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, शिक्षण अपर सचिव आणि कार्यालयीन वापरासाठी एक अशा एकूण 6 गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या एका इनोव्हा गाडीची किंमत (जीएसटी आणि इतर मिळून) 22 लाख 83 हजार रुपये आहे.

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 1 कोटी 37 लाख रुपये मंजूर केले आहेत. जनतेचे सेवक असल्याचा दावा करत सत्ता स्थापन करणार्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांवर केलेली उधळपट्टीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत असलेल्या खडखडाटामुळे अनेक विभागांतील कर्मचा-यांना निम्मा पगार देण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली असतानाही राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी इनोव्हा क्रिस्टा ही २२ लाख ८३ हजार किंमतीची आरामदायी कार खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी कर्ज घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर येत असताना हि उधळपट्टी या काळात कशाला असा जाब विचारत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत; कोरोना पॅकेज द्यायला पैसे नाहीत, वा रे वा.. सरकार..!’ अशा शब्दात भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनासाठी विशेष पॅकेज सरकारने जाहीर करावं, पोलीस व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्यांना द्यावेत, अशी मागणीही भाजप नेते राम कदम यांनी यावेळी केली.

महाराष्ट्राचा जनतेला एकही रुपयांची मदत न करणार हे सरकार महाराष्ट्रातील मंत्र्यांसाठी नवीन गाड्या घेत आहे. करोडो रुपयांचा गाड्या घ्यायला सरकारकडे पैसे आहेत. मात्र, कोरोना संकटात योद्ध्याचे काम करणाऱ्या पोलीस तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात आहेत, ते पगार द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. मग हे मंत्र्यांचा गाड्या कसे घेत आहेत? असा सवाल कदम यांनी सरकारला केला आहे.

इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

‘संजय राऊत चर्चेत राहण्यासाठी कधी काय करतील याचा अंदाजच लावू शकत नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!