Share

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यायी शिक्षण विभागाने तयारी दर्शवली होती. शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाचे सचिव इतर अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ATKT च्या तब्बल 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांच्या बाबतीत ‘हेराफेरी’ होण्याची शक्यता’

दरम्यान, 3 दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार नववी, दहावी आणि बारावीची प्रत्यक्ष शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केले जाणार आहेत. सहावी ते आठवीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा होती, अखेर आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

संकट काळातही लोकांचा छळ करणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही- कॉंग्रेस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!