वर्धा : जिल्हयातील बहुसंख्य शेतकरी कापूस हे एकच पिक घेतात. परंतु ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतक-यांनी कापसाच्या लवकर येणा-या वाणाची लागवड करुन त्यानंतर बागायती उशिरा पेरणी होणा-या गहू पिकाच्या वाणाची लागवड करावी. यामुळे गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासोबतच पर्यायाने उत्पन्नात सुध्दा वाढ होऊ शकते.
परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना
एकल कापूस पिकासाठी प्रती हेक्टर लागवड खर्च 43 हजार 765 रुपये येत असून प्रति हेक्टर 12 क्विंटल 22 किलो चे उत्पादन होऊन 66 हजार 279 रुपये प्रती हेक्टर उत्पन्न मिळते यामध्ये निव्वळ नफा प्रति हेक्टर 22 हजार 514 रुपये तर एकल बागायती गहू पिकासाठी प्रती हेक्टर लागवड खर्च 26 हजार 966 रुपये येत असून प्रति हेक्टर 23 क्विंटल 85 किलो चे उत्पादन होऊन 45 हजार 04 रुपये प्रती हेक्टर उत्पन्न मिळते यामध्ये निव्वळ नफा प्रति हेक्टर 18 हजार 638 रुपये मिळण्याचे गणित आहे.
जिल्हयातील देवळी तालुक्यातील काही शेतकरी लवकर येणा-या कापूस पिकानंतर उशिरा पेरणी होणा-या कमी कालावधीच्या गहू वाणाची लागवड करतात. त्यांचे सरासरी उत्पन्न याप्रमाणे आहे.
कापूस पिकासाठी प्रती हेक्टर लागवड खर्च 35 हजार 500 रुपये येत असून प्रति हेक्टर 12 क्विंटल 125 किलो चे उत्पादन होउुन 60 हजार 625 रुपये प्रती हेक्टर उत्पन्न मिळते यामध्ये निव्वळ नफा प्रति हेक्टर 25 हजार 125 रुपये तर गहू पिकासाठी प्रती हेक्टर लागवड खर्च 16 हजार 875 रुपये येत असून प्रति हेक्टर 15 क्विंटल 05 किलो चे उत्पादन होउुन 31 हजार 125 रुपये प्रती हेक्टर उत्पन्न मिळते यामध्ये निव्वळ नफा प्रति हेक्टर 14 हजार 375 रुपये मिळण्याचे गणित आहे.
काँग्रेसमध्ये खांदेपालट,जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर, 9 नवे जिल्हाध्यक्ष
या दोन्ही प्रकारच्या पिकाचा विचार केला असता कापूस व गहू एकल पिकापेक्षा लवकर येणारा कापूस व त्यांनतर उशिरा पेरणी होऊ शकणारा कमी कालावधीचा गहू याची लागवड केली असता मिळणारा नफा जास्त आहे. कापूस पिकाच्या बी.टी.वाणाच्या पिकेव्ही-081, अंकुर जय बीटी, महिको उपज प्लस, महिको जंगी, राशी मॅक्स 608, जे.के.118 हे 140 ते 160 दिवसांचा कालावधी असणारे व लवकर येणारे वाण वापरणे तसेच गहू पिकाचे पीडीकेव्ही वाशीम, पिडीकेव्ही सरदार, पी.के.व्ही. संकरीत-2 उशिरा पेरणी होऊ शकणारे वाण कापूस पिकानंतर गहू या पिक पध्दतीने लागवड करण्यासाठी उपयोगी ठरु शकते.
लवकर येणारा कापूस पिकानंतर उशिरा पेरणी योग्य गहू वाणाच्या लागवडीचे फायदे
डिसेंबर व जानेवारी मध्ये कापूस पिकावर येणा-या बोंडअळी नियंत्रण व शेवटच्या वेचणीचा खर्च वाचतो आणि गहू , हरभरा पिकाच्या लागवडीमुळे उत्पन्नात प्रती हेक्टरी अंदाजे 8 हजार ते 15 हजार रुपयाची वाढ होते. दोन पिके घेतल्यामुळे सदर जमिनीमुळे पिकाची फेरपालट होते व त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. कापूस पिकाची काढणी आधीच केल्यामुळे बोंडअळी नियंत्रणाच्या खर्चात बचत होते. व कापूस पिकापासून मिळणारे उत्पन्न हे संपूर्ण वर्षाचे निव्वळ उत्पन्न म्हणुन गणले जाऊ शकते. भूमी, मजूर व इतर या संसाधनाचा कमीत कमी वापर होतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

