Share

पडळकरांनी फडणवीसांना विचारावे, सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केल्यावर काय होते?

Published On: 

मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

तुकाराम मुंढेंच्या विरोधात गेलेल्या भाजपची झाली फजिती, कांग्रेसने साथ सोडल्याने पडले तोंडघशी

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पडळकर यांनी केलेल्या या टीकेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.हा कसला गोपीचंद हा तर छिछोरचंद अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केल्यावर काय होते हे एकदा फडणवीसांना विचारावे असा सल्लाही रविकांत वरपे यांनी दिला आहे.भाजपनं गोपीचंद पडळकर यांना आमदार का केले याचं उत्तर आज राज्याला समजले. परंतु भाजपच्या दारात गळ्यात पट्टा घालून साखळी घातलेल्या भूकणाऱ्याला महाराष्ट्र दाद देणार नाही असेही रविकांत वरपे यांनी ठणकावून सांगितले आहे.

परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना

दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी पवारसाहेबांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही रविकांत वरपे यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!