🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार चांगलेचं सक्रीय झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून शरद पवार यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. तर शरद पवार हे पाकिस्तानचे समर्थक असल्याची टीका खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील करत आहेत. यावरून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला आहे. जर मी पाकिस्तानचा पुरस्कार करतो तर मला पद्मभूषणने का गौरविले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी यावर भाष्य केले आहे. मोदींना पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा राखता आली नाही. पंतप्रधान ही एक संस्था आहे. या संस्थेकडे माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग असतात. मला आनंद झाला असता तर त्यांनी माझे वाक्य नीट ऐकून स्वत:चे वक्तव्य केले असते. इतक नव्हे तर त्यांनी हा विचार करायला हवा होता की, मला जर पाकिस्तान आवडत असता तर त्यांच्या सरकारने मला पद्म विभूषण सन्मानाने का गौरविले, अशा शब्दात पवारांनी भाजप नेत्यांचा आणि पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पाकिस्तानच्या परिस्थितीबाबत वक्तव्य केले होते. भारताविरुद्ध बोलने हेच पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्करचे धोरण आहे. या धोरणामुळे पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांचे हित साधत नाही. पण त्या देशातील सत्ताधाऱ्यांचे हित साध्य होते, असे पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181871309682139136?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181871109106364416?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181868846765920259?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
