Share

राज्यमंत्री दत्ता भरणे यांना पितृशोक; अजित पवारांकडून भरणेमामांचं सांत्वन

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडिल विठोबा भरणे यांचे काल रात्री निधन झालं आहे. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: भरणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

विठोबा भरणे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर काल रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 90 वर्षांचे होते. इंदापूर तालुक्यात तात्या नावाने ते ओळखले जायचे. प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती.

विठोबा भरणे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या मुळगावी भरणेवाडी येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरणेवाडीत राज्यमंत्री भरणे यांच्या घरी जाऊन विठोबा भरणे यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी भरणे कुटुंबांचे सांत्वन केले.

लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशा भावना यावेळी दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!