मुंबई : रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांची गाणी गात आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल आज सोशल मिडीयावर स्टार बनल्या आहेत. त्यांच्या सुरेल आवाजातील एका व्हायरल व्हिडिओने रानू प्रसिद्धीझोतात आल्या. काही दिवसांपूर्वी संगीत दिग्दर्शक आणि गायक हिेमेश रेशमियाने रानू यांना त्याच्या आगामी चित्रपटासाठी गाणं गाण्याची संधी दिली.
मात्र काही महिने लोटल्यानंतर आता परिस्थिती पुन्हा पालटली असून राणू मंडल यांच्या नशीबात पुन्हा जुने दिवस आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात दोन वेळेचं जेवण मिळणंही राणू मंडल यांच्यासाठी कठीण झालं आहे.
त्यांना कधी एक वेळचं जेवण, त्यातही फक्त भात मिळत असल्याचं समोर आलं आहे. आसपासच्या लोकांनी काही दिलं तरच त्यांना अन्न मिळत आहे. अन्यथा उपाशीपोटी झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
रानू मंडल पश्चिम बंगालच्या राना घाट स्टेशनवर आपल्या सुरेल आवाजात, लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात होत्या. त्यावेळी अतींद्र चक्रवर्ती नावाच्या एका व्यक्तीने त्यांचा गातानाचा व्हिडिओ शूट करुन तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला. या व्हिडिओने रानू यांचं संपूर्ण आयुष्यचं बदललं.
राणू मंडल पुन्हा चर्चेत , पटकावले गूगलच्या सर्च लिस्टमध्ये स्थान
पहा, असं का म्हणाला सोनू सूद? ‘Chinese लोगों को डिटेल्ज़ भेजो’
तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाच काहीच नाही, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

