🕒 1 min read
कोलकाता – इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० मधील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. कोलकातामध्ये सुरू असलेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स IPL इतिहासातील महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला आहे. त्याला १५ कोटी ५० लाखांना कोलकाताने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातला दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. बंगळुरु, दिल्ली आणि कोलकाता यांच्यात पॅट कमिन्सवरुन स्पर्धा रंगली. अखेर कमिन्स १५.५० कोटी रुपयांना कोलकात्याला विकला गेला. आयपीएल इतिहासात युवराज सिंगवर सर्वाधिक बोली लागली होती. २०१५ साली दिल्लीने युवराजला १६ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
तर पहिल्यांदा ख्रिस लीन या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूवर बोली लागली.लीनवर मुंबई इंडियन्सने बोली लावली असून त्यांनी त्याला 2 कोटी या त्याच्या मुळ किंमतीत संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे आता लीन 2020 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.
धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघात दाखल झाला आहे. युसूफ पठाण आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम या दोघांना विकत घेण्यात कोणीही रस दाखवला नाही.सॅम करन ५ कोटी ५० लाखांच्या बोलीवर चेईन्नवासी झाला.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1207614480084897793?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1207620589147455488?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
