Share

IPL 2022: पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार ; ‘या’ तारखेला संघाशी जोडले जाणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख जाहीर झाली आहे. यानंतर विदेशी खेळाडू इतर स्पर्धेत खेळत असल्याने आयपीएलमध्ये कधी जुळणार असा सवाल उपस्थित राहिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मात्र ६ एप्रिलपासून आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या खेळाडूंना ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ऑस्ट्रेलिया संघ मार्चमध्ये पाकिस्तान विरुद्ध ऐतिहासिक मालिका खेळणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना पाकिस्तान दौरा संपल्यानंतरच आयपीएल मध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलिया १९९८ नंतर प्रथमच तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक T20 साठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मालिकेचा शेवटचा सामना ५ एप्रिलला होणार आहे. डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल हे आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुकणार आहेत.

कसोटी खेळणारे खेळाडू आणि कर्मचारी या आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानला रवाना होणार आहेत, तर लिमिटेड ओव्हरचे खेळाडू आणि कर्मचारी वन-डे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी दौऱ्याच्या मध्ये संघात सामील होतील. वॉर्नर आणि मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतील तर ग्लेन मॅक्सवेल आणि जॉश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे प्रतिनिधित्व करतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!