मुंबई : ठाकरे सरकार करोनाबाबत गंभीर नाही. त्यांचे निर्णय आणि नियम केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी होत नाही, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली.
सभागृहात पत्रकार अर्णब गोस्वामींवर हक्कभंग आणण्यापेक्षा करोनावर, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर, पूरस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे. ती होणार नसेल तर आम्ही इथे आलो कशाला, असा सवाल करीत फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.करोना संकटाच्या काळात सरकारवर टीका करण्याची आम्हाला हौस नाही. या काळात आम्ही संयमानेच वागेलो आहोत. मात्र, सरकार करोनाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.
यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे ब्लू आय बॉय आहेत. त्यांनी केंद्राला सांगून महाराष्ट्राला कोरोनाच्या उपचारासाठी पुरवण्यात येणाऱ्या साहित्यसामुग्रीचा पुरवठा सुरु ठेवावा, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन केले आहे. ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते.
यावेळी राजेश टोपे यांनी म्हटले की, केंद्र सरकारकडून राज्यांना कोरोनाच्या उपचारांसाठी करण्यात येणारा साहित्यसामुग्रीचा पुरवठा १ सप्टेंबरपासून बंद झाला आहे. त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु, दिल्लीचे ब्लू आय बॉय असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यासे हे पैसे वाचू शकतात. त्यांनी केंद्राला यासंदर्भात सांगावे. जेणेकरून राज्याचे ३०० कोटी रुपये वाचतील, असा दावा राजेश टोपे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर अटक…
मराठी अस्मितेचा पुळका असणाऱ्या शिवसेनेला ‘हे’ पटत का?
‘दाऊदने नाही तर नाही पण किमान अब्दुल खाटकाला तरी थोरातांना फोन करायला सांगा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

