Share

किती काळ राजकारण करणार? आयुष्यात दुसरं केलं तरी काय? पक्षीय राजकारण इथल्या इथे थांबली पाहिजेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

‘राजकारण पाचवीलाच पुजलेलं आहे. किती काळ राजकारण करणार?, आयुष्यात दुसरं केलं तरी काय? हा जो काही प्रसंग आहे त्यामध्ये मला राजकारण नकोय, पक्षीय राजकारण इथल्या इथे थांबली पाहिजेत अशा शब्दांमध्ये ठाकरे यांनी विरोधी पक्षाला आपल्या खास शैलीमध्ये सुनावलं आहे.

कोरोनाचं संकट असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी कोणाचंही नाव न घेता दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यामधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला.

पुढे,’आज एक गोष्ट मी बघितली संपूर्ण देशात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. मात्र सगळेजण राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. सगळेजण पंतप्रधान मोदींसोबत आहेत आणि मोदी आपल्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

सगळं राज्य सरकारे केंद्र सरकारसोबत आहेत आणि केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत आहे. केंद्र आपल्याला काय हवं ते विचारत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!