पुणे : पुण्याच्या बुधवार पेठेत 70 ते 80 वर्ष जुन्या वाड्याचा काही भाग आज सकाळी कोसळला. यावेळी अंगावर दगड माती कोसळल्याने दोघे थोडक्यात बचावले. तर दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका वृद्ध महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
बुधवार पेठतील सिंगालिया वाडा 90 ते 100 वर्ष जुना आहे. रविवारी सकाळी 7 च्या सुमारास ही वाड्याचा काही भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच ताबडतोब अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यावेळी पहिल्या मजल्यावर राहणारे कुटुंबातील 2 सदस्य भिंतीखाली अडकले होते.
गंगुबाई कल्याणी या 70 वर्षाच्या आजींना आणि विनायक कल्याणी या 48 वर्षाच्या व्यक्तींना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. दोन जखमींशिवाय या वाड्यात कोणी राहात नव्हते. हा वाडा खूप जुना असून जीर्ण झाला होता. पडलेल्या भिंतीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरु आहे.” अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही पहा –


