मुंबई : कोरोना नंतर वाहन उद्योग पुन्हा सुरू झाला आणि अनेक नवनवीन वाहन कंपन्यांकडून लाँच करण्यात आली यामध्ये महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही लाँच करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. कंपनी या वर्षी एक्सयूव्ही 700 ही कार लाँच करू शकते. ही कार कंपनीच्या नवीन म्हणजेच W601 SUV प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे.
मात्र आता XUV700 ही कार आल्यानंतर कंपनी XUV500 या कारच उत्पादन पूर्णपणे बंद करणार आहे. क्रेटा, सेल्टॉस आणि जीप कंपास एसयूव्ही लॉन्च झाल्यानंतर एक्सयूव्ही 500 आउटडेटेड झाली. त्यामुळेच महिंद्रा कंपनी आता XUV700 ही शानदार कार लाँच करणार आहे.
दरम्यान नवीन महिंद्राची नवीन एसयूव्ही XUV700 ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनांसोबत भारतीय बाजारात उतरवू शकते. यात ग्राहकांना मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय मिळणार आहे. याशिवाय, यात ऑल व्हील ड्राइव्ह दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात आजपासून लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद ? वाचा एका क्लिकवर !
- येणारे दिवस अनिल देशमुखांसाठी कठीण असतील; भाजप नेत्याचे भाकीत
- आधी खात्यावर पैसे द्या मग लॉकडाऊन करा म्हणणाऱ्या चव्हाणांची भाषा बदलली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…
- फडणवीसांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती, त्यांचं केंद्रात अजिबात वजन नाही – नाना पटोले
- ‘तुम केहना क्या चाहते हो?’ निलेश राणेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

