Share

मोबाईल टॉवरच्या बॅटरी लंपास करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांनी केले गजाआड

Published On: 

🕒 1 min read

परभणी :  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी कारवाई करत मोबाईल टॉवरच्या बॅटरी लंपास करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. परभणी शहरातील आर. के. हॉटेल समोर ग्रँड कॉर्नर येथे एक संशयित पिक अप पकडून त्याची झडती घेण्यात आली. या झडतात त्या पीक अप मध्ये चोरी केलेल्या मोबाईल टॉवरच्या ४० बॅटरी आणि मोबाईल टॉवरचे पॉवर प्लांटचे मॉडूल सापडले आहेत.

सदरील प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींकडे चौकशी केली असता मोबाईल टॉवरचे बॅटरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या टोळीत १० आरोपींचा सामावेश असून यातील एकूण ७ आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एका आरोपीस यापूर्वीच पोलिसांनी पकडले आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपींनी गुन्हे केल्याचे ही पोलीस तपासात समोर आले आहे.

एकंदरीत पोलीस तपासात विविध कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करून त्याची विल्हेवाट लावण्याकरीता विक्री करणारे आरोपींचे मोठे रॅकेट निष्पण्ण झाले आहे. या आरोपींकडून चारचाकी वाहने, मोबाईल टॉवरच्या बॅटरी यांसह इतर साहीत्य मिळून असा एकूण ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई सपोनि व्यंकटेश आलेवार, पोउपनि साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, आशा सावंत, जयश्री आव्हाड, बालाजी रेडडी यांच्या पथकाने केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!